नाथसागर जलाशयात एक लाख क्यूसेक पेक्षा जास्त वेगाने पाणी दाखल
जलाशयाचे सर्व २७ दरवाजे उघडले
गोदावरी नदीच्या पात्रात १ लाख ३७५२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
रमेश लिंबोरे,
पैठण (प्रतिनिधी) _ नाशिक, अहिल्या नगर, संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नाथ सागर जलाशयाच्या दिशेने एक लाखापेक्षा जास्त वेगाने पाणी झेपावत असल्याने मंगळवारी सकाळी ६:३० ते ६:४५ वाजेच्या सुमारास नाथसागर जलाशयाचे सर्व २७ दरवाजे ०३ उंच फूट उचलले. गोदावरी नदीच्या पात्रात सुमारे एक लाख तीन हजार सातशे बावन्न क्यूसेक पेक्षा जास्त पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले.
दरम्यान येणारी पाण्याची आवक पाहता रात्रभर नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात होता. त्यामुळे भीतीपोटी नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी रात्र जागून काढली. शनिवार, रविवारी रात्री तसेच सोमवारी रात्रभर नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने नाथसागर जलाशयाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी झेपावत आहे..त्या मुळे नाथसागर जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात सुमारे एक लाख तीन हजार सातशे बावन्न क्यूसेक पेक्षा जास्त पाणी सोडल्या जात असून गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
दरम्यान गोदावरी नदीने रोद्र रूप धारण केले. नाथ मंदिरा मागील नाथ घाट, मोक्षघाट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तरी दशक्रिया करणारे नागरिक आपले जीव धोक्यात घालून मोक्ष घाटावर दशक्रिया विधी करताना दिसत आहेत. नाथ सागर जलाशयातून गोदावरी नदीचे पात्रात सोडलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे यांनी गोदाकाच्या नागरिकांना तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
त्यांच्या आदेशाने शहरात पहाटे चार वाजेपासून एकनाथ तावरे हे लाऊड स्पीकर द्वारे नागरिकांना सावधानतेचा इशारा देत होते. दरम्यान पावसाचे पाणी सतत चौथ्या दिवशी राहुल नगर, संतनगर येथील घरात घुसले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत नगर भागात पाण्यामुळे पाच दुचाकी वाहन वाहून गेली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.